पर्रा येथील ब्रिटोवाडा भागात वैयक्तिक वादातून सुरी हल्ला
सदाम मुल्ला, रवी गोयल आणि दीपक सरकार जखमी
जखमींना जिल्हा रुग्णालय व गोमेकॉमध्ये दाखल
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व सखोल तपास सुरू
म्हापसा पुढारी वृत्तसेवा
पर्रा येथे वैयक्तीक कारणातून एकमेकांवर केलेल्या सुरी हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी, परस्परविरोधी तक्रार नोंद करण्यात आली आहे. या हल्ल्यात सदाम मुल्ला (वय २४, हडफडे), रवी गोयल (पर्रा) व दीपक सरकार (४५,पर्रा व मूळ प. बंगाल) हे जखमी झाले आहेत.
ही घटना, सोमवारी (१२ जानेवारी) सायंकाळी ब्रिटोवाडा, पर्रा येथे घडली. वैयक्तीक कारणातून सदाम मुल्ला, रवी गोयल आणि दीपक सरकार या तिघांत वाद झाला. त्याचे पर्यवसन हल्ल्यात व मारहाणीत झाले. जखमींमध्ये सदाम, रवी आणि दीपक यांचा समावेश आहे.
त्यांना जिल्हा रुग्णालयात व गोमेकॉत दाखल केले आहे. दीपक सरकार याने सदाम मुल्ला व रवी गोयल यांच्या विरोधात तक्रार दिली असता, पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तर सदाम मुल्ला यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी दीपक सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.