पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयुष रुग्णालय तसेच इतर मोठ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना मिळणाऱ्या रोजगाराबाबत सरकारने सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी मिशन फॉर लोकलचे प्रमुख राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था येथील नोकरभरतीचा प्रश्न केंद्र सरकारकडे मांडून भरती प्रक्रियेला स्थगिती मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे त्यांनी अभिनंदन केले. हा निर्णय स्थानिक युवकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, धारगळ येथील आयुष रुग्णालय आणि मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या प्रकल्पांमध्ये बाहेरील राज्यांतील उमेदवारांना अधिक संधी मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्यस्थिती समोर येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.