Goa 
गोवा

Goa- वीरश बोरकरांची 'झाकली मूठ सव्वा लाखाची!'

अंतर्गत धुसफूस सुरूच : २०२७ विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षासमोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

RG party internal conflict and Manoj Parab allegations in Goa

पणजी : मागील काही दिवसांपासून आरजी पक्षामध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना वेग आला आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून पक्षातील काही सदस्यांवर थेट नाव घेऊन नाराजी व्यक्त केली. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केल्याने आगामी काळात पक्षामध्ये मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाही आमदार बोरकरांचे मौन मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाध्यक्ष किंवा पक्षाविरोधात कोणतेही वक्तव्य करण्याचे त्यांनी टाळले असून, त्यांच्या शांत भूमिकेमुळे विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मनोज परब हे आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात, तर वीरेश बोरकर यांची प्रतिमा संयमी आणि शांत राजकारणी अशी आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही नेते एकत्र पत्रकार परिषद किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नसल्याने पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चाना अधिक बळ मिळत आहे.

२०२७ विधानसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षातील वाद अधिक तीव्र झाल्यास त्याचा थेट परिणाम आरजीच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. पक्षाचे समर्थक आणि शुभचिंतकांमध्येही याबाबत नाराजी आणि चिंता दिसून येत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, गोव्यात मजबूत पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT