Prostitution Racket  Pudhari
गोवा

Panaji Spa Prostitution Case |पणजी स्पा वेश्याव्यवसाय प्रकरणातील चारजणांना दिलासा; एकावर कारवाई कायम

Panaji Spa Prostitution Case- पणजी स्पा वेश्याव्यवसाय प्रकरणातील चारजणांना दिलासा; एकावर कारवाई कायम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : एका दशकापूर्वी पणजीतील एका स्पा वेश्याव्यवसाय प्रकरणात चार जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेला तक्रार (एफआयआर) व आरोपपत्र रद्द केले असून पाचव्या आरोपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला आहे.

न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी दिलेल्या आदेशात बेरुल नझीर, शेख अहमद, अहमद रझा आणि कबीर खान यांच्याविरोधातील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे या चौघांवरील कारवाई रद्द करण्यात आली असली तरी बी. दादापीर या पाचव्या अर्जदाराविरोधातील कार्यवाही कायम ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण १९ मे २०१५ रोजी नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पणजीतील एका स्पा व सलूनवर छापा टाकला होता. मसाजच्या आडून वेश्याव्यवसाय चालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून ३,५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा वापरून ही कारवाई केली होती. छाप्यात बोगस ग्राहक एका मसाज क्युबिकलमध्ये आढळला, तर पाचवा आरोपी दादापीर दसऱ्या क्युबिकलमध्ये मसाज घेताना सापडला. इतर चार आरोपी मात्र स्पाच्या कॉरिडॉरमध्ये बसलेले आढळले होते.

न्यायालयाने नमूद केले की, आरोपत्रातील पहिल्या चार आरोपींनी कोणालाही वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले, तस्करी केली किंवा शोषण केल्याचे कोणतेही ठोस आरोप नाहीत. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम ३७०ए (२) तसेच अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत गुन्हा लागू होत नाही. तसेच, केवळ 'ग्राहक' असल्याने अशा तरतुदी लागू होत नाहीत, असेही न्यायालयाने पूर्वीच्या न्यायालयांच्या निर्णयांचा दाखला देत स्पष्ट केले. मात्र, पाचव्या आरोपीविरोधातील परिस्थिती वेगळी असल्याने त्याच्यावरील खटला सुरूच राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT