पर्वरी: पुढारी वृत्तसेवा
पणजी शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेले बस स्टॉप प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अर्धवट असून हे स्टॉप उघड असल्यामुळे पावसाळ्यात भिजत प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार आहे.
पणजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी असे लाखो रुपये खर्चुन बस स्टॉप उभारण्यात आले आहेत. पावसाळ्यातील बससाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना त्रासदायकच ठरणार आहेत. मांडवी तीरावरील या बस स्टॉपवर वादळी वाऱ्यासह पावसाचे पाणी अंगावर झेलण्याच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे. या शेडच्या मागे आडोसा लावणे अत्यंत जरुरीचे असून इमेजिन पणजीने त्याची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.