पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित वार्षिक ३७ वा शिमगोत्सव मंगळवारी ३ मार्चपासून सुरू होत आहे. या उत्सवानिमित्त पणजी येथे शनिवारी दि. ७ रोजी चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य व वेशभूषा स्पर्धा होणार असून त्यासाठी १,५७.५०० रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेपे यांनी दिली.
यावेळी समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक व संस्थापक सदस्य किशोर नार्वेकर उपस्थित होते. धेंपे म्हणाले, गावातील शिमगोत्सव शहरांमध्ये आणण्याचे श्रेय पणजी शिमगोत्सव समितीला जाते. ३७ वर्षांपूर्वी पणजीत पहिला शिमगोत्सव साजरा करण्यात आला.
संस्थेने पारदर्शक कारभार करून स्वतः चे कार्यालय पणजीत घेतले. त्यासोबतच ५० लाख रुपये ठेव रुपात समितीकडे आहे. मंगळवारी आझाद मैदान येथे सकाळी वाजल्यापासून गुलालोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पुढील सहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात मंगळवारी ३ रोजी संध्याकाळी ७ वा. ऑर्केस्ट्रा, बुधवारी ४ रोजी नाटक, गुरुवारी ५ रोजी जल्लोष नृत्याचा कार्यक्रम, शुक्रवारी ६ रोजी सुरसंगम गायनाचा कार्यक्रम, शनिवारी ७ रोजी चित्ररथ व रोमटामेळ मिरवणूकसंध्या. ४ वाजता आणि रविवारी ८ रोजी संध्या. ७ वाजता लावण्यखणी हा लावणीचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमापूर्वी उमाकांत वाडकर, सुरेंद्र वळवईकर व मॅक्सी जे परेरा यांचा गौरव होईल. पणजी शिमगोत्सव समितीचे संस्थापक सदस्य अवधूत आंगले यांचाही गौरव होणार असल्याचे बॅपे यांनी सांगितले.
रोमटामेळ पथकांसाठी दि.४ रोजी सोडत काढली जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी घेपे यांच्या हस्ते शिमगोत्सव समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
लोकनृत्य स्पर्धा प्रथम २५ हजार रु., द्वितीय २० हजार रु. तृतीय १५ हजार रु., चौथे १० हजार रु., पाचवे ८ हजार रु. व उत्तेजनार्थक ५ हजार रुपयांची १० बक्षिसे. त्यासोबत वेशभूषा स्पर्धेसाठी मोठ्या गटात प्रथम १० हजार रुपये व अन्य बक्षिसे तसेच लहान गटात पहिले बक्षीस ५ हजार रुपये व अन्य बक्षिसे दिली जातील.