पणजी : पुढारी वृत्तसेवा
तरुणीचे अश्लील छायाचित्रे काढून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी संशयित अजय खंडेलवाल (मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याच आदेश पणजी जलदगती न्यायालयाने (पोक्सो) दिला आहे. संशयिताने त्याला आरोपमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
पीडित तरुणीने दंडाधिकाऱ्यांसमोर संशयिताने केलेल्या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली आहे. मध्यप्रदेशच्या पीडित तरुणीने तिच्यावर संशयिताने हणजूण येथील एका हॉटेलमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध केलेल्या लैंगिक शोषणाची तक्रार इंदोर (मध्यप्रदेश) येथील महिला पोलिस स्थानकात दाखल केली होती.
हा गुन्हा गोव्यात घडल्याने ती हणजूण पोलिसांकडे पाठवण्यात आली होती. संशयिताने हा गुन्हा २० नोव्हेंबर २०२३ रोजी केला होता. हणजूण पोलिसांनी आरोपाखाली बलात्काराच्या गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली होती.
त्याच्याविरुद्ध तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. संशयिताला आरोपामुक्त करण्यासाठी हे कारण होऊ शकत नाही. संशयिताने पीडित तरुणीशी समझोता केला असला तरी त्याची माहिती पोलिसांना पीडितेने दिलेली नाही.
पीडितेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली जबानी कायम असून त्यातून संशयिताविरुद्धचा गुन्हा सिद्ध होतो. त्याने लैंगिक शोषण करण्यापूर्वी तिचे अश्लिल छायाचित्रेही काढली होती व मारहाणही केली होती. ही छायाचित्रे पुरावे म्हणून सादर केली नसली तरी आरोप त्याची निश्चितीवेळी आवश्यकता नाही, अशी बाजू सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडली.