Panaji Municipal Election 2026 
गोवा

Panaji Municipal Election 2026 | पणजी महापालिकेचा आखाडा सज्ज! 30 प्रभागांसाठी 69 उमेदवार रिंगणात; 23 जागी थेट लढत

Goa News | ८ उमेदवारी अर्ज मागे; २३ जागी सरळ लढती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेच्या ११ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ३० प्रभागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या भाजप समर्थक पॅनेल समोर उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आम्ही पणजीकर पॅनेलने कडवे आव्हान उभे केले असून ३० ही प्रभागात दोन्ही पॅनेलमध्ये लढती होणार आहे. पणजी महापालिकेच्या एकूण ३० प्रभागापैकी तब्बल २३ प्रभागात एकास एक लढती होणार असून ६ प्रभागांत तिरंगी लढती होणार आहेत.

प्रभाग २६ मध्ये ५ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त उमेदवार असलेला हा एकमेव प्रभाग आहे. यांनी घेतली उमेदवारी मागे : प्रभाग १ लिना दोड्डामणी, प्रभाग ८ व १५ जॉन पो, प्रभाग ११ यादीली राहुल, प्रभाग १६ प्रतिभा बोरकर ढगे, प्रभाग १७ जॉर्डन फालेरो, प्रभाग १८ उदय च्यारी, प्रभाग २४ आदम खान.

रिंगणातील उमेदवार : प्रभाग १ अनुसूचित जमाती महिला दामिनी कुंकळ्येकर, रोशन मार्टीन्स व युक्ता जांबावलीकर, प्रभाग २ ओबीसी महिला कॅरोलिना पो व उमा वळवईकर, प्रभाग ३ ओबीसी महिला मार्गारिटा फर्नांडिस व जॉन पो,

प्रभाग ४ खुला : रोहित मोन्सेरात, जॉन पो व अग्नेलो सिल्वेरा,

प्रभाग ५ खुला : सुदिन कामत व किशोर शास्त्री, प्रभाग ६ ओबीसी डॉ. शीतल नाईक व बेंतो लोर्ना, प्रभाग ७खुला : संजीव देसाई व लिवोनीद फुर्तादो, प्रभाग ८ ओबीसी महिला : शुभदा शिरगावकर व करिना शिरोडकर, प्रभाग ९ खुला सुरेंद्र फुर्तादो व कबिर माखिजा पींटो, प्रभाग १० खुला प्रसाद अमोणकर व विष्णू नाईक,

प्रभाग ११ खुला : तुकाराम चिनन्नावर व गौरव नाईक, प्रभाग १२ खुला : ब्रिजेश कवळेकर, शबनम खान व वर्षा शेट्ये, प्रभाग १३ खुला नीळकंठ च्यारी व उदय मडकईकर, प्रभाग १४ ओबीसी मदन फातर्पेकर व प्रज्योत वायंगणकर, प्रभाग १५ ओबीसी : शायनी चोपडेकर व सूरज नाईक, प्रभाग १६ महिला अस्मिता केरकर व प्रांजल नाईक, प्रभाग १७ खुलाः डेनीस जॉर्ज व जॅक सुखीजा, प्रभाग १८ खुला आशिष नागवेकर व कृष्णा शिरोडकर, प्रभाग १९ महिला निकीता नाईक व दिवोदीता परेरा,

प्रभाग २० शुभम चोडणकर, गोविंद चोडणकर व महेश रेवणकर, प्रभाग २१ ओबीसी : मनीषा मणेकर व भालचंद्र तारकर पेडणेकर, प्रभाग २२ महिला नेहा कवळेकर व दीक्षा माईणकर, प्रभाग २३ महिला विद्या गडकर व ज्योती मसुरकर, प्रभाग २४ खुला : शिवदास नाईक रायकर, नितीन नार्वेकर व करण पारेख, प्रभाग २५ महिला माधवी आमोणकर व कीर्ती साखळकर, प्रभाग २६ खुला वसंत आगशीकर, शुभदा धोंड, राजेश केळुस्कर, नम्रता सरदेसाई व संजय सरमळकर, प्रभाग २७ओबीसी विठ्ठल चोपडेकर व वासुदेव मणेरकर, प्रभाग २८ खुला रुपेश हळर्णकर, दत्तराज हळर्णकर व घनश्याम नास्नोडकर, २९ महिला सँड्रा मारिया दाकुन्हा व लिबेर्टा ईआचारी, प्रभाग ३० खुला सिल्वेस्टर फर्नांडिस व वैभव सळगावकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT