Panaji Municipal Corporation Reservation 
गोवा

Panaji Municipal Corporation | पणजी महापालिकेचा करदात्यांना अल्टिमेटम! 31 मे पूर्वी घरपट्टी आणि व्यवसाय कर भरणे बंधनकारक

Panaji Municipal Corporation | सावधान! पणजी महापालिकेचा कर भरण्यास उशीर झाल्यास दंड आणि व्याजाचा बडगा; पाहा अंतिम तारीख

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेने (सीसीपी) बुधवारी जारी केलेल्या पत्रकानुसार आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नागरिकांना व व्यावसायिकांना विविध कर आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३१ मे निश्चित केली आहे.

जारी केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, महापालिकेच्या अधिकार क्षेत्रातील इमारती आणि जागांच्या सर्व मालकांनी आणि करदात्यांनी एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी घर कर, व्यापार किंवा व्यवसाय परवाना शुल्क, फलक कर आणि स्वच्छता शुल्कासह परवाना शुल्क ३१ मे पुर्वी भरणे आवश्यक आहे.

३१ मे नंतर जे कर भरतील त्यांच्यावर कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार व्याज आणि दंड आकारला जाईल. कर भरणा महापालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत रोख किंवा चेकद्वारे करता येईल.

कर शुल्क भरताना करदात्यांनी नवीनतम घर कर आणि व्यापार परवान्याच्या पावत्या सादर करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष समाप्त होत असल्यामुळे २५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत कोणतेही व्यवहार महापालिका करणार नाही असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, अतिरिक्त व्याज आकारणी टाळण्यासाठी घरकर भरणाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षाची थकबाकी २५ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT