Accident Pudhari
गोवा

Panaji Road Accident | मिरामार-पणजी रस्त्यावर भरधाव टॅक्सीचा कहर; झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्याचा मृत्यू

Panaji Road Accident | चालकावर पणजी पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मिरामारहून पणजीकडे जाणाऱ्या भरधाव टॅक्सीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला उडवले. हा अपघात डी. बी. बांदोडकर रोडवर रविवारी दुपारी घडला. अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची ओळख पटली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी टॅक्सीचालक मर्दान अली (वय २८, रा.चिंबल) याच्यावर पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित पादचारी महावीर उद्यानाकडून मार्केट रस्त्यावर येण्यासाठी जंक्शन जवळ असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता पार करत होता. त्याचवेळी त्याच्या उजव्या बाजूने भरधाव वेगाने आलेल्या टॅक्सीने (जी ए ०७टी २१४१) त्याला जोरदार धडक दिली.

धडक इतकी मोठी होती की पादचारी ३० फुटावर जाऊन पडला. या धडकेत टॅक्सीची डावी हेडलाईट व इतर भागाचे नुकसान झाले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेला कॉल करूनही ती २० मिनिटांनी पोचली, तोपर्यंत पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी नेला व अपघातग्रस्त टॅक्सी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT