पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत इसवणचा दर ९०० ते १,००० रु किलो, तर पापलेटचा दर १,००० ते १,२०० रुपये होता. रविवारी संकष्टी असल्याने अनेक मत्स्यखवय्यांनी मासळी बाजाराकडे पाठ फिरवली होती. अनेकांच्या घरात शाकाहारी जेवण असल्याने माशांच्या खरेदीत घट झाली होती. हॉटेल व्यावसायिकांकडून मात्र दरदिवशी प्रमाणे मासे खरेदी केले गेले.
बाजारात मोठे बांगडे २५० ते ३०० रु. किलो मिळत होते. या आठवड्यात इसवण, पापलेटसह इतर माशांच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. मोठे बांगडे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले होते. त्यांचा दर २५० ते ३०० रु. किलो, तर मध्यम बांगडे १५०-२०० रु. किलो दराने मिळत होते.
शिनाणे मासळी बाजारात नव्हते पण जुने गोवे परिसरात आकारानुसार ३०० ते ५०० रु. किलो दराने मिळत होते. कालवांचा दरही आकारानुसार २०० ४०० रु. वाटा असा होता. मध्यम तिसरे ५०० रु.ना १०० मिळत होते.
खुबे ३०० ते ४०० रुपये १०० या दराने मिळत होते. मोडसो आणि चणाक मासा ५०० रुपये किलो दराने मिळत होता. काही विक्रेत्यांनी चणाक माशांचे वाटे लावले होते. ते ३०० रुपयांना एक आणि ५०० रुपयांना २ या दराने मिळत होते.
पणजीतील मासळीचा दर
इसवण ९००- १,००० रु. किलो, पापलेट १,०००-१,२०० रु. किलो, सरंगा मध्यम ४०० रु. किलो, मोठा ५००-६०० रु. किलो, प्राँस ३०० ते ५०० रु. किलो, बांगडे १५० २५० रु. किलो, तारले २०० २५० रु. किलो, माणके मोठे ३००-४०० रु. किलो, लहान २०० रु., सौंदाळे २५०-३०० रु. किलो, लेप २०० रु. वाटा, कर्ली १५०-२५० रु. नग, तारले १०० रु. वाटा.