पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत रविवारी इसवण, पापलेटची आवक कमी असल्याचे दिसले. त्यामुळे पापलेटचा स्थिर म्हणजे १,००० ते १,२०० रुपये किलो होता. इसवण ८०० ते १,००० रुपये किलो होता. मात्र, इतर माशांची आवक वाढली होती.
एरवी क्वचित दिसणारे राणे मासे यावेळी दिसले. त्यांचा आकार मोठा असल्याने ४०० रु. किलो दराने मिळत होते. बाजारात मोठे माणके उपलब्ध होते. त्यांचा दर २५० ते ३०० रुपये किलो होता.
कोकारी, दोडया ४०० रु. किलो, तर बांगडे २५० ते ३०० रु. किलो मिळत होते. या माशांना ग्राहकांची पसंती दिसली. या आठवड्यात इसवण, पापलेट वगळता इतर माशांचा दर सर्वसामान्यांना परवडेल असाच होता.
मासळी बाजारात मोठे बांगडे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले होते. त्यांचा दर २५० ते ३०० रु. किलो, तर मध्यम बांगडे १५०-२०० रु. किलो दराने मिळत होते. शिनाणे आकारानुसार ५०० ते ६०० रु. किलो दराने मिळत होते. कालवांचा दरही आकारानुसार २०० ४०० रु. वाटा असाच होता.
शिनाणे, कालवा नेहमीच उपलब्ध असत नाहीत, त्यामुळे त्यांचा दर थोडा अधिक असतो. तिसरे ५०० रु. ना १०० मिळत होते. खूबे ३०० ते ४०० रुपये १०० या दराने मिळत होते. मोडसो आणि चणाक मासा ५०० रुपये किलो दराने मिळत होता. काही विक्रेत्यांनी चणाक माशांचे वाटे लावले होते. ते २०० रुपयांना एक आणि ३०० रुपयांना २ या दराने मिळत होते.