यंत्राने दोन तासांत केलेले भात कापणी व मळणी. Pudhari photo
गोवा

Goa Paddy farming|भातकापणी, मळणी यंत्रे शेतकऱ्यांसाठी तारणहार

वेळ, श्रम वाचत असल्याने गोव्यातील बळीराजा सुखावला; राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कामात मग्न

पुढारी वृत्तसेवा

अनुदानाचा मिळतोय लाभ

एका तासाला यंत्राचे भाडे २,८०० रुपये

Paddy Harvesting And Threshing Machines Lifeline For Farmers

पणजी : भातकापणी व मळणी यंत्रे गोव्यातील शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरली आहेत. भर उन्हात भात कापायचे, बांधून घराकडे किंवा खळ्यावर न्यायचे, तिथे सगळी आवश्यक जोडणी करून मळणी करायची किंवा भात झोडायचे तेव्हा कुठे लोंब्यामधील दाणे वेगळे व्हायचे. हे काम कष्टाचे आणि खूपच खर्चिक असायचे. मात्र, भातकापणी आणि मळणीसाठी यंत्रे उपलब्ध झाल्याने भात कापणीपासून दाणे वेगळे करण्यापर्यंतची प्रक्रियाच सोपी झाली आहे.

चोडण येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी या यंत्रामुळे कामे खूप सोपी झाल्याचे सांगितले. सरकारकडे काही यंत्रे आहेत, तर काही खासगी आहेत. एका तासाला यंत्राचे भाडे २,८०० रुपये आहे. त्यातील १,४०० रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळतात. शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह केवळ १,४०० रुपये भरावे लागतात. मात्र, कापणी, मळणी झटपट होते.

मळणी झाल्यावर हे यंत्र शेतकऱ्यांच्या खळ्यावर किंवा रस्त्याशेजारी अंथरलेल्या प्लास्टिक कापडावर भात ओतून रास (ढिगारा) करून देते. नंतर शेतकरी भात वारे करून घरी घेऊन जातात. सध्या भात कापणी व मळणी यंत्रे शेतात फिरत असून शेतकरी झटपट भात पीक घरात येत असल्याने सुखावले आहेत.

यंत्रांची संख्या मागणीपेक्षा कमी

राज्यात १७० कापणी व मळणी यंत्रांची सद्यस्थितीत गरज आहे. मात्र, सरकारकडे केवळ २२ यंत्रे आहेत. साहजिकच शेतकऱ्यांना खासगी यंत्रांवर अवलंबून राहावे लागते. त्यांनाही सतत काम मिळत असल्याने शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत नाहीत व भातकापाणी लांबणीवर पडते.

'भातशेती'साठी शेतकऱ्यांची शक्कल

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भातपीक कापणीचा हंगाम संपत आला असला, तरी उशिरा लावलेली अथवा वायंगणी मातशेती आता पिकू लागली आहे. मात्र, भातपिकावर ताव मारण्यासाठी पक्षांचे थवे उतरत असल्याने माडेल - चोडण येथील शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी भातपिकाच्या वर काही फूट अंतरावर सगळीकडे रंगीबेरंगी चकाकत्या प्लास्टिक पट्टया बांधल्या आहेत. त्या पट्टया वाऱ्याबरोबर हलू लागल्या की, पक्षी बिथरून मागे फिरतात आणि पीक वाचते. वायंगणी शेती असल्याने तिथे उशिरा लावणी करण्यात आली होती. त्यामुळे भात कापणीला उशीर झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT