Goa Assembly Election  Pudhari File Photo
गोवा

Goa Assembly Election | विरोधकांतील फुटीचा भाजपला फायदा? युती न झाल्यास विरोधी आमदारांची आमदारकी धोक्यात

Goa Assembly Election | राज्यात २०१२ पासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारला सत्ताभ्रष्ट करून सत्तांतर करण्यासाठी विरोधी पक्षांची युती होणे गरजेचे आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर
राज्यात २०१२ पासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारला सत्ताभ्रष्ट करून सत्तांतर करण्यासाठी विरोधी पक्षांची युती होणे गरजेचे आहे. ही युती न झाल्यास सध्या असलेल्या विरोधी आमदारांची आमदारकीच धोक्यात येण्याची शक्यता दिसते.

विधानसभा निवडणुकीला अवघे महिने बाकी असताना विरोधी काँग्रेससह इतर पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस केवळ पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर टीकाटिप्पणी करण्यात धन्यता मानत आहे. गोवा फॉरवर्डचे नेते लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे राज्यात येऊन ई २० इंधनाचा मुद्दा उपस्थित करत असून केवळ अल्पसंख्याक मतदारसंघांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत. आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर पक्ष बांधणीत गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांचे ऐक्य दिसत नाही.

आपचे नेते काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत असल्याने व फॉरवर्ड काँग्रेसला सहकार्य करत नसल्याने युती होण्याची शक्यता दुरावली आहे. काँग्रेस व आरजीची युती होण्याची शक्यता दिसत आहे.
विरोधी पक्षनेते व काँग्रेस आमदार युरी आलेमाव २०२२ मध्ये कुंकळ्ळी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. यावेळी तिथे काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी शड्डू ठोकला असून त्यांनी आपण लोकांचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. तिथे गोवा फॉरवर्ड व आपने उमेदवार ठेवले तर २०२२ च्या निवडणुकीत ३ हजार मतांनी निवडून आलेले आलेमाव संकटात येतील.

२०२२ च्या निवडणुकीत आलेमाव यांना ९,८६६ मते तर त्यांचे विरोधक भाजपचे उमेदवार क्लाफासियो डायस यांना ६,६३२ मते मिळाली होती. केपेचे काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा आहेत. मात्र येत्या निवडणुकीत केपे आदिवासी (एसटी) साठी राखीव झाल्यास डिकॉस्टा यांना आमदारकी राखणे कठीण जाईल. किंवा केपे...

फातोर्डा येथे काँग्रेस उमेदवार उभा राहिला तर...

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांची स्थिती मजबूत दिसत असली तरी २०२२ मध्ये काँग्रेसने तिथे उमेदवार उभा केला नव्हता. सरदेसाई यांना ११,०६७ मते तर भाजपचे दामू नाईक यांना ९५३७ मते मिळाली होती. यावेळी फातोर्डात काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर उभे राहिले, तर सरदेसाई यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT