Jalgaon Accident pudhari photo
गोवा

Vasco Accident | नवेवाडे उतरणीवर सांडलेल्या ऑईलमुळे अपघातांची मालिका; काही वाहनचालक जखमी

Vasco Accident |"चालकाचा निष्काळजीपणा नडला; ऑईलवर मातीऐवजी केवळ पाने टाकली अन् सकाळी अनेक दुचाकीस्वार घसरले!"

पुढारी वृत्तसेवा

वास्को : पुढारी वृत्तसेवा

नवेवाडे उतरणीवर बस दुरुस्तीनंतर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलची योग्य विल्हेवाट न लावल्याने शनिवारी (दि. ४) सकाळी अनेक दुचाकी घसरून अपघात झाले. या अपघातांत काही दुचार्कीचे नुकसान झाले असून, काहीजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, नवेवाडे उतरणीवर एक बस अचानक नादुरुस्त झाल्याने ती रस्त्यावरच उभी करण्यात आली होती. यादरम्यान बसमधून काही ठिकाणी ऑईल सांडले.

याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ऑईलवर माती टाकली होती. तसेच बस दुरुस्त झाल्यानंतर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती टाकूनच पुढे जाण्याच्या सूचना संबंधित चालकाला देण्यात आल्या होत्या.

मात्र, बस दुरुस्त झाल्यानंतर चालकाने ऑईलवर माती टाकण्याऐवजी केवळ पाने टाकून तेथून प्रस्थान केले. पावसामुळे ऑईल रस्त्यावर आणखी पसरले आणि शनिवारी सकाळी त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक दुचाकी त्यावरून घसरल्या.

या अपघातांत काही वाहनांचे नुकसान झाले, तर काही वाहनचालक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नंदादीप राऊत यांनी अग्निशमन दलाला कळविले. जवानांनी तातडीने रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती टाकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT