Petrol Diesel Supply  (File Photo)
गोवा

Petrol Diesel Supply | पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा साठा पुरेसा

Petrol Diesel Supply | इंधन विपणन कंपन्यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंड पुरवठा कायम ठेवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. विविध राज्यांमध्ये इंधनाच्या मागणीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी पुरवठा आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेचा समन्वय अधिक मजबूत केला आहे.

तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या हंगामी कृषी कामांमुळे आणि कापणी हंगामामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच इतर पुरवठादारांच्या तुलनेत कमी दर उपलब्ध असल्यामुळे किरकोळ ग्राहक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल पंपांकडे वळत आहेत.

याशिवाय संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचाही सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्री केंद्रांकडे वाढता कल दिसून येत असल्याने मागणीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या त्यांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे सातत्याने कार्यरत आहेत. टर्मिनल्स, डेपो, पाईपलाईन व्यवस्था, एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आणि रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून अखंड पुरवठा आणि वेळेवर पुनर्भरण सुनिश्चित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT