Soham Naik Case  
गोवा

Soham Naik Case | त्या जागी माझा भाऊ असता, तरी त्याला धिक्कारले असते

Soham Naik Case | आमदार नीलेश काब्राल; संशयिताला शिक्षा होणारच

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

दैनिक 'पुढारी'तून उघडकीस मुलींच्या आलेले अल्पवयीन शोषणाशी संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर असून संबंधित आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा होणारच, त्याला कोणतेही अभय दिले जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी केले.

केरळ दौऱ्यावरून नुकतेच गोव्यात परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना काब्राल म्हणाले की, संबंधित युवकाला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

'त्याच्या जागी माझा भाऊ असता, तरी मी त्याला धिक्कारले असते,' असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. कुडचडे मतदारसंघात अशा प्रकारच्या घटनांना कोणताही थारा नसून हा मतदारसंघ शांततेसाठी ओळखला जातो. येथे विकासाला गती देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणातील पीडितांची आपण स्वतः भेट घेणार असून गरज भासल्यास त्यांना संरक्षणही देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. काब्राल पुढे म्हणाले की, 'मी केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेलो असताना हा प्रकार घडला.

गोव्यात परतल्यानंतर तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.' भाजपामध्ये कुडचडेत 'ए' आणि 'बी' टीम असा कोणताही प्रकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT