अमेरिकन महिलेला जंगलात ठेवले बांधून Pudhari Photo
गोवा

गोवा : जंगलात बांधून ठेवलेल्या अमेरिकन महिलेची नवी माहिती समोर

वैदयकिय उपचार, व्हिसा, तमिळनाडू कनेक्शन याबाबतची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बांदा : पुढारी वृतसेवा

रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत अमेरिकन महिला आढळली होती. या महिलेला सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या घटनेतील अनेक मुद्दे समोर आले आहेत. यामुळे पोलिसांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहेत. पोलिसांनी घेतलेल्या माहितीत सदर महिला ही गोवामध्ये वैद्यकिय उपचार घेण्यासाठी आलेली अशी माहिती समोर आली आहे. त्याच प्रमाणे तिने अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नूतनीकरण करून घेण्यासाठी मागणी केली होती. पण त्याकडे प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. अशा पण गोष्टी समोर आल्याने पोलिसांच्या तपासाला वेगळीच दिशा मिळाली आहे.

मंगळवारी (दि.30) रात्री उशिरापर्यंत बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे हे गोवा विदेशी महिलेचा जबाब घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्या महिलेने आपण गोवा येथे काही दिवस वास्तव्य केल्याची ही माहिती दिली. यावेळी तिने तामिळनाडू येथील एका लॉजचे हे नाव घेतले. मात्र, तमिळनाडू येथील लॉज बाबत तिच्याकडून पूर्ण माहिती मिळाली नाही. सदर महिलेने गोवा काही महिने अगोदर गोवा पोलिसांची भेट घेऊन आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी मदत मगितल्याचेही सूत्रांकडून समोर येत आहे.

महिलेवर गोवा येथे मनसोपचार तज्ञ विभागात उपचार

सदर महिलेवर गोवा बांबुळी येथे जानेवारी ते मे या कालावधीत मनसोपचार विभागात उपचार करण्यात आले होते. याबाबतची नोंद बांबोळी हॉस्पिटल येथे सापडून आली आहे त्यामुळे सदर महिलेबाबत बाबतचे गुढ अजूनही वाढत चालले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर अनेक तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. जर २०२४ यामध्ये तिच्यावर गोवा येथे उपचार चालू होते तर तिला रोणापाल येथे जंगलात कोणी आणून बांधून ठेवले याचे गूढ वाढले आहे.

गोवा येथे व्हिसासाठी केला होता अर्ज

सदर महिलेनचा व्हिसा वैधता संपल्याने गोवा येथे आल्यावर आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी गोवा राज्यात विसासाठी अर्ज दाखल केला होता. याबाबतचे मेल आणि अर्ज याचा तपशील सदर महिलेने दाखवला. मात्र, अशी घटना घडली असल्यास याबाबत गोवा पोलीस तसेच गोवा प्रशासन यांचे विदेशी महिलेबाबत हलगर्जीपणा केल्याचे बोलले जात आहे. मात्र सदर महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिन्ही नोंदवलेल्या जवाब याची सहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय पोलीस घेण्यास धजावत आहेत. जर महिलेने गोवा राज्यात विसासाठी केलेला अर्ज याची घटना खरी असल्यास यामध्ये गोवा प्रशासन तसेच गोवा पोलीस यांचा निष्काळजीपणा उघडीस पडत आहे.

तामिळनाडू येथे गेलेल्या पथक बाबत अजूनही गोपनीयता

तामिळनाडू येथे गेलली पथक यांबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही माहिती देत नसल्याने त्या ठिकाणी काय घडले याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही.

विदेशी महिलेले ओरस जिल्हा दवाखान्यात आणण्यात आले

सदर महिलेवर गोवा बांबोळी येथे उपचार केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे पुढील उपचारासाठी सदर महिलेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा दवाखान्यात बुधवारी (दि.31) रात्री उशिरा आणण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील डॉक्टर पाहणी करून पुढील निर्णय पोलीस व आरोग्य यंत्रणा घेणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT