अमेरिकन महिलेला जंगलात ठेवले बांधून; पतीवर गुन्हा नोंद Pudhari Photo
गोवा
अमेरिकन महिलेला जंगलात ठेवले बांधून; पतीवर गुन्हा नोंद
गोवा सीमेजवळील रोणापाल येथील घटना : पोलिस तपासासाठी तामिळनाडूत
बांदा : भूषण आरोसकर
रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत अमेरिकन महिला आढळली होती. या महिलेला सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली आहेत. तेथील तपासानंतर सत्यता समोर येणार आहे. तर पतीला ताब्यात घेतल्यावर त्या महिलेला कधी व का बांधून ठेवण्यात आले या विषयीचे रहस्य उलगडणार आहे.

