पणजी; पुढारी वृत्तसेवा : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National Games 2023 Goa) गोव्याला पहिले सुवर्णपदक मिळाले. नेत्रावळी-सांगे येथील २२ वर्षीय बाबू गावकर याने पुरुषांच्या लेझर रन प्रकारात अव्वल कामगिरीची नोंद करत पहिला क्रमांक पटकावला.
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गोवा राज्यासाठी पहिले सुवर्णपदक पटकावणाऱ्या बाबू गावकर याचे अभिनंदन केले आहे. तसेच केलेल्या कामगिरीबद्दल गावकर याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात पार पडली. लेझर रन प्रकारात ६०० मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. अवघ्या दोन ते अडीच महिन्यातील प्रशिक्षणाच्या जोरावर बाबू याने सुवर्णपदक पटकाविले आहे. पूर्वी मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या बाबू याची ही पहिलीच प्रमुख मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आहे.
हेही वाचा :