Obesity And Mental Health Canva
गोवा

Goa Obesity | लठ्ठपणाने वाजवली गोव्यात धोक्याची घंटा

Goa Obesity | राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून माहिती समोर; 15-49 वयोगटांतील लोकांची संख्या अधिक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९-२१) नुसार गोवा हे देशातील लठ्ठपणाचे प्रमुख हॉटस्पॉट ठरले आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार गोव्यातील २५ टक्के प्रजननक्षम वयोगटातील विवाहित महिला लठ्ठ आहेत. हे प्रमाण केरळ (२५ टक्के) आणि तामिळनाडू (२९ टक्के) इतकेच आहे.

पुरुषांमध्येही राज्यातील १५-४९ वयोगटांतील एक-तृतीयांशपेक्षा जास्त पुरुषांचे वजन जास्त किंवा लठ्ठपणाच्या श्रेणीत मोडणारे आहे. ९९८-९९ ते २०१९-२१ या काळात गोव्यातील महिलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण तब्बल १५ टक्के गुणांनी वाढले आहे. राष्ट्रीय पातळीवर १० राज्यांमध्ये ३० टक्केपेक्षा जास्त महिलांमध्ये लठ्ठपणा आढळला, त्यात गोव्याचा समावेश आहे. दक्षिण भारतात प्रक्रिया केलेल्या अन्नाचा उष्मांकातील वाटा सर्वाधिक आहे.

नियमित मांसाहार आणि शारीरिक हालचालींचा अभावही पोटावरील चरबी वाढवतो. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढतो. गोव्यातील महिला व पुरुषांमध्ये उच्च रक्तशर्करेचे प्रमाणही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे 'सुशेगाद' जीवनशैलीबरोबरच आहार व व्यायामावर भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

देशात गोवा अपवाद

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार फक्त गोवा, तामिळनाडू आणि दादरा नगर हवेली या ३ राज्यांतच ५ वर्षांखालील मुलांमधील लठ्ठपणा कमी झाला आहे. देशातील ३३ राज्यांत मुलांमधील लठ्ठपणा वाढला असताना गोवा अपवाद ठरले.

नेमकी कारणे काय ?

अभ्यासकांच्या मते वाढती संपन्नता, शहरीकरण, बैठी जीवनशैली आणि आहारातील बदल ही प्रमुख कारणे आहेत. श्रीमंत कुटुंबातील महिलांमध्ये लठ्ठपणाचा धोका ५.३७ पट अधिक असतो. आठवड्यातून एकदा तरी टीव्ही पाहणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठपणाची शक्यता २१ टक्के अधिक आहे. गोव्यात पर्यटन व सेवा क्षेत्रामुळे उत्पन्न वाढले, प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त पेये, तेलकट-मांसाहारी जेवण यांचे प्रमाण वाढले.

पोटाची चरबी जास्त धोकादायक

गोव्यातील महिलांमध्ये ओटीपोटाचा लठ्ठपणा (Abdominal Obesity) राष्ट्रीय सरासरी ३९.६ टक्केपेक्षा अधिक आहे. बॉडी मास इंडेक्स (BMI) सामान्य असूनही पोटावरील चरबीमुळे चयापचयाचे आजार वाढतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT