Nana Patekar Postmortem Report File Photo
गोवा

Nana Patekar Postmortem Report: नाना पाटेकरांच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर; गोमेकॉच्या शवविच्छेदन अहवालात मोठा खुलासा

अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचा मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ), बांबोळी येथील डॉक्टरांच्या पॅनेलने हा अहवाल जारी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nana Patekar death reason goa medical college Postmortem Report

पणजी : अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ), बांबोळी येथील डॉक्टरांच्या पॅनेलने हा अहवाल जारी केला असून, त्यात मृत्यू नैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण झाली. त्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता दोना पावला येथील मणिपाल रुग्णालयातून नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. तेथे साक्षीदार व पाटेकर यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या पॅनेलने शवविच्छेदन करून अहवाल जारी केला.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता कौटुंबिक मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून आपली प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. पहाटे सुमारे ३.३० वाजता नाईक यांनी संदेश पाहिल्यानंतर तातडीने दोना पावला येथील त्यांच्या फ्लॅटवर धाव घेतली. त्यावेळी नाना पाटेकर बेशुद्ध पडले होते.

त्यानंतर नाईक यांनी केअरटेकरला मणिपाल रुग्णालयाकडून वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. आपत्कालीन वाहन आल्यानंतर पहाटे सुमारे ४.३० वाजता नाना पाटेकर यांना दोना पावला येथील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी नाना पाटेकर यांचे पुतणे प्रसाद पाटेकर आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांचे जबाब नोंदवले. दोघांनीही मृत्यूबाबत कोणताही घातपात झाल्याचा संशय नसल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पणजी पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT