दामू नाईक Pudhari File Photo
गोवा

Damu Naik | खासदार राहुल गांधी बालिश नेते

Damu Naik | राजकारण तापले; दोन्ही घोषणा विधानसभा निवडणुकीत गाजण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे बालिश नेते असून, त्यांचे वर्तन संपूर्ण जग पाहत आहे. स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना कॉलरला धरून मागे खेचतानाचे दृश्यही सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या गोष्टींची किंवा संस्कृतीच्या रक्षणाची अपेक्षा ठेवता येत नाही. देशाची परंपरा आणि संस्कृती जपू न शकणारे नेते गोव्याचे रक्षण काय करणार, अशी टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केली.
राहुल गांधी यांनी रविवारी मडगाव येथील सभेदरम्यान गळ्यातील कुणबी शाल काढून व्यासपीठावरील पोडियमवर ठेवल्याच्या प्रकाराबाबत पत्रकारांनी सोमवारी विचारले असता, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली.

म्हादईवर भूमिका स्पष्ट का नाही?

कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळवणे हे गोव्यासमोर मोठे संकट आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना राहुल गांधी यांनी गोव्यात आल्यानंतर म्हादईप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे निरीक्षक आणि केंद्रीय नेते या प्रश्नावर गप्प का आहेत, असा सवाल दामू नाईक यांनी केला. काँग्रेसचे नेते लोकांची दिशाभूल करण्यासाठी गोव्यात आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गोमंतकीय सुशिक्षित असून, त्यांना हा प्रश्न समजतो. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकत नाही, असे नाईक म्हणाले.

माविन गुदिन्हांना तंबी...

भाजपमध्ये उमेदवार निवडीची स्वतंत्र प्रक्रिया असून, त्यानुसार उमेदवारी निश्चित केली जाते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करताना शब्दांवर नियंत्रण ठेवावे, अशी तंबी दामू नाईक यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना दिली. पक्षनेत्यांनी वक्तव्य करताना संयम बाळगला पाहिजे. त्यांच्या वक्तव्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात. मंत्री आणि पक्षाच्या सदस्यांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT