वास्को : मुरगावातील सुमारे १६० वारकऱ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या पालखीसह शुक्रवारी (दि. १०) सकाळी सडा येथून पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केले. या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून एक श्वानही वारकऱ्यांसोबत सडा ते पंढरपूर असा पायी प्रवास करत आहे. शुक्रवारी सकाळी सडा येथून वारीला प्रारंभ झाला.
महिला आणि पुरुष अशा मोठ्या संख्येने वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणात आणि अखंड हरिनामाच्या गजरात पालखी दामोदर मंदिरासमोर पोहोचली. तेथे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी पालखीचे स्वागत करून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी आमदार दाजी साळकर आणि त्यांच्या पत्नी शमी साळकर यांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती डोक्यावर घेऊन काही अंतर पायी चालत वारीत सहभाग नोंदविला.
मुरगाव वारकरी संस्थेतर्फे तीन वर्षांपूर्वी या वारीला प्रारंभ केला होता. पहिल्या वर्षी केवळ ५५ वारकरी सहभागी झाले होते. त्यानंतर सहभागात सातत्याने वाढ होत गेली. गतवर्षी १२० महिला-पुरुष सहभागी झाले होते, तर यंदा ही संख्या सुमारे १६० वर पोहोचली आहे. यावेळी अनेक नागरिक काही अंतरापर्यंत वारीत सहभागी झाले.
हळदोणा-पंढरपूर पायी वारीला तारक आरोलकरांकडून शुभेच्छा म्हापसा : पुढारी वृत्तसेवा श्री देवी सातेरी भगवती माऊली वारकरी मंडळ, हळदोणा यांच्या वतीने आयोजित हळदोणा ते पंढरपूर पायी वारीचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात झाला. या प्रसंगी म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. तारक आरोलकर यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पूजा, आरती आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात वारीला प्रारंभ झाला.
"ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी डॉ. आरोलकर शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, समर्पण, शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. शतकानुशतके अखंड सुरू असलेली ही परंपरा समाजाला समानता, सेवाभाव आणि अध्यात्माचा संदेश देत आहे.
या पवित्र परंपरेचे जतन करून तिचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य श्री देवी सातेरी भगवती माऊली वारकरी मंडळ समर्पित भावनेने करत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले. या प्रसंगी वारकरी मंडळाचे पदाधिकारी,
हळदोणा-पंढरपूर पायी वारीला तारक आरोलकरांकडून शुभेच्छा
म्हापसा : श्री देवी सातेरी भगवती माऊली वारकरी मंडळ, हळदोणा यांच्या वतीने आयोजित हळदोणा ते पंढरपूर पायी वारीचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात झाला. या प्रसंगी म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. तारक आरोलकर यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
पारंपरिक पूजा, आरती आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात वारीला प्रारंभ झाला. "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी डॉ. आरोलकर शुभेच्छा दिल्या.
यावेळी ते म्हणाले की, पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, समर्पण, शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. शतकानुशतके अखंड सुरू असलेली ही परंपरा समाजाला समानता, सेवाभाव आणि अध्यात्माचा संदेश देत आहे. या पवित्र परंपरेचे जतन करून तिचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य श्री देवी सातेरी भगवती माऊली वारकरी मंडळ समर्पित भावनेने करत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले. या प्रसंगी वारकरी मंडळाचे पदाधिकारी होते.