Goa monsoon arrival May 31
पणजी : गोव्यात ३१ मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून २६ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाच-सहा दिवसांत तो गोव्यात पोहोचणार आहे.
राजधानी पणजीतील कमाल तापमानाचा पारा आजही ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानाचा पारा २६ अंश सेल्सिअस होता. हवामान खात्याने शनिवार, रविवारी पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात सकाळपासूनच दमट हवामान होते.
सत्तरीत वीज उपकेंद्राला आग; बत्ती गुल
सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने झाडे व फांद्या मोडून पडल्या. वीज उपकेंद्रातील यंत्रणेला आग लागल्याने साखळी, डिचोली परिसरातील वीज प्रवाहही काल रात्रीपासून खंडित झाला. घरगुती वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.