monsoon Pudhari File Photo
गोवा

Monsoon Arrival Goa | सत्तरी तालुक्यात मान्सूनचे दमदार आगमन

Monsoon Arrival Goa | जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत; होंडातील भाजी विक्रेत्यांची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

धावे : पुढारी वृत्तसेवा

अनेक दिवसांपासून मान्सूनच्या . प्रतीक्षेत असलेल्या सत्तरी तालुक्यात न रविवारी अखेर पावसाने दमदार हजेरी न लावली. वाळपई नगरासह संपूर्ण सत्तरी तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून 1 काढत मान्सूनचे दिमाखात आणि वे जोमाने आगमन झाले. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. न मान्सून कधी दाखल होणार 1 याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू .

होती. शेतकरी वर्ग मशागतीची कामे न सुरू करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर रविवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच आकाश ढगांनी भरून गेले होते आणि उष्णता जाणवत होती. दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत पावसाने प्रतीक्षा लावली; मात्र त्यानंतर त्याने जोरदार बरसत संपूर्ण परिसर भिजवून टाकला.

रविवारी होंडा येथे आठवडी बाजार भरत असल्याने भाजीपाला, फळे, कपडे, प्लास्टिक साहित्य आदी वस्तू विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील फिरत्या विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. बाजारासाठी आलेल्या नागरिकांनाही अचानक सुरू झालेल्या पावसामुळे धावपळ करावी लागली. दरम्यान, सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. उशिरापर्यंत त्याने उघडीप दिली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT