गोवा

समुद्रातील दादागिरी खपवून घेणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

दिनेश चोरगे

पणजी  : भारतीय समुद्रात आता कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. भारतीय नौदलाची स्वायत्तता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी मदत केली जाणार असून समुद्रात कुठेही अनुसूचित प्रकार घडल्यास पहिला प्रतिसाद देणारे भारतीय नौदल असेल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले.

आयएनएस मांडवी बेती वेरे येथील नौसेना युद्ध महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कारवार येथील सी बर्ड नेव्हल बेजवर दोन एअर अग्नीबंबाचे नौदलात लोकार्पण केले. हा नेव्हल बेज आशियातील सर्वात मोठा नौदल तळ ठरला आहे.

मंत्री सिंह म्हणाले, बेती येथे जागतिक दर्जाची अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा निर्माण केल्याबद्दल नौदलाचे कौतुक आहे. नौदलाची जेवढी मान ताठ राहील, तेवढी भारताची मान उंचावेल. चोल भवन हे नौदलाच्या आकांक्षांचे प्रतीक आणि भारताच्या सागरी उत्कृष्टतेचा वारसा आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा आणि आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा अभिमान वाटणाऱ्या देशाच्या नव्या मानसिकतेचेही हे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरीकुमार, संरक्षण सचिव गिरिधर हरमोनी आदी उपस्थित होते.

सार्वभौमत्व जपण्यासाठी करणार मदत

शत्रूंच्या वाढलेल्या हालचाली आणि व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता, आपल्या धोक्यांच्या आकलनाचे पुनर्मूल्यांकन करणे आणि त्यानुसार आपली लष्करी संसाधने आणि धोरणात्मक लक्ष पुन्हा संतुलित करणे आवश्यक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देशाच्या भूमिकेची केवळ पुर्नकल्पनाच केली नाही, तर ती मजबूतही केली. त्यामुळे भारताने भारतीय समुद्रात आपले स्थान भक्कम निर्माण केले आहे. सर्व सहयोगी देशांना त्यांची स्वायत्तता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी मदत केली जाणार हे आम्ही सुनिश्चित केल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT