Illegal Stone Quarrying  AI Photo
गोवा

Illegal Stone Quarrying | केपेच्या नाकेरी येथे खान खात्याची मोठी धडक कारवाई; बेकायदेशीर जांभा दगड चिरेखाणीवर छापा

Illegal Stone Quarrying | ५ लाखांहून अधिक किमतीची यंत्रसामग्री जप्त

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केपे तालुक्यातील नाकेरी येथे सर्व्हेक्षण क्रमांक ८१/० मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीवर खान अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई करताना सुमारे ५ लाखांचे एक यंत्र व उत्खनन केलेला जांभा दगड जप्त केला. घटनास्थलळी मोठ्या प्रमाणात या चिरेखाणीत जांभा दगडाचे उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले.

प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन झाल्याचे आढळून आले. उत्खननासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची तसेच परिसरातील उत्खननामुळे झालेल्या नुकसानाची एकत्रित अंदाजित किंमत १५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर जमीन नाकेरी कोमुनिदादच्या मालकीची असल्याचे माहिती समोर आली आहे.

कोमुनिदादच्या मालकीच्या जमिनीवर आवश्यक परवानग्या आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळता जांभा दगडाचे उत्खनन केले जात होते का, याचा तपास संबंधित यंत्रकांकडून केला जात आहे. छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची नोंद करण्यात आली असून, तिच्या वापराबाबत आणि उत्खननाच्या प्रमाणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणात संबंधित व्यक्ती किंवा खात्याकडे खानकामासाठी आवश्यक परवाने, पर्यावरणीय मंजुरी तसेच इतर वैधानिक परवानग्या होत्या का, याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जप्त यंत्रसामग्री आणि उत्खननामुळे झालेलया नुकसानाचे अंतिम मूल्यांकन तसेच या प्रकरणातील जबाबदार व्यक्तीची निश्चिती करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या तपासातून बेकायदा उत्खननाचा नेमका कालावधी, उत्खननाचे प्रमाण आणि त्यामागे कोणाचा सहभाग होता, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT