गोवा

Taleigao Assembly Election| ताळगावातून निवडणूक लढवण्याची इच्छा; महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले, "आईचा वारसा पुढे नेणार"

Taleigao Assembly Election| ताळगावातून निवडणूक लढवण्याची इच्छा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र महापौर रोहित मोन्सेरात यांनी ताळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाचा असेल आणि पक्ष जो निर्णय घेईल तो आपण मान्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित मोन्सेरात म्हणाले, मला ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. कारण तो माझ्या आईचा मतदारसंघ आहे. तिच्या कार्याचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. मात्र, पक्षाने मला योग्य उमेदवार मानले तरच मी निवडणूक लढवेन. माझ्यासाठी पक्ष सर्वात महत्त्वाचा आहे. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याचे मी पूर्णपणे पालन करीन.

जेनिफर मोन्सेरात यांनी ताळगाव मतदारसंघात अनेक विकासकामे राबवत मतदारांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पुढील उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र रोहित मोन्सेरात यांच्या या वक्तव्यानंतर ताळगावच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष या मतदारसंघासाठी कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT