Margaon-Mumbai Railway|
Margaon-Mumbai Railway Pudhari
गोवा

Margaon-Mumbai Railway| मडगाव-मुंबई वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकण रेल्वेने रद्द केल्या गाड्या

पुढारी वृत्तसेवा

दीपक जाधव

कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे-मालपे येथे बोगद्यात मध्यरात्री 3 वाजता पुन्हा चिखल जमा झाला. त्यामुळे कोकण रेल्वेची मडगाव-मुंबई वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. हा चिखल हटविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून त्यासाठी सुमारे 300 कामगार कार्यरत आहेत.

दरम्यान, वंदे भारत, जनशताब्दी, मांडवी, सावंतवाडी- दिवा व मुंबई- मंगळुरूसह नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या असून सहा गाड्या पनवेल, लोणावळा, पुणे मिरज मडगाव यामार्गे वळवण्यात आलेल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील मडुरे ते पेडणे विभागादरम्यान पेडणे-मालपे बोगद्यात मंगळवारी 9 रोजी दुपारी रुळावर पाण्यासह चिखल आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. बोगद्यातील चिखल काढून ही वाहतूक रात्री पूर्ववत करण्यात आली. मात्र मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा त्याचठिकाणी पाणी येऊ लागल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.

कोकण रेल्वेने रद्द केलेल्या गाड्या

गाडी क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्र. 12051 मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्र. 10103 मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस, गाडी क्र. 12133 मुंबई सीएसएमटी - मंगळुरु जंक्शन एक्सप्रेस, गाडी क्र. 10104 मडगाव जं.- मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस, गाडी क्र. 50108 मडगाव जं. - सावंतवाडी रोड प्रवासी गाडी, गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, गाडी क्र. 12052 मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी - जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्सप्रेस, गाडी क्र. 12449 मडगाव जं. - चंदीगड एक्स्प्रेस, गाडी क्र. 12620 मंगळुरु सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी), गाडी क्र. 12134 मंगळुरु जं. - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. 50107 सावंतवाडी रोड - मडगाव.

अंशतः रद्द गाड्या पुढीलप्रमाणे :

गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. कोकणकन्या एक्स्प्रेस, गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस सावंतवाडीपर्यंत सोडण्यात आल्या आहेत.

वळवण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे

गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. मंगला एक्सप्रेसचा 9 रोजीचा प्रवास पनवेल - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव मार्गे वळवला आहे. गाडी क्र. 19577 तिरुनेलवेली - जामनगर एक्स्प्रेसचा 9 रोजीचा प्रवास आता कुमता येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला आहे.

गाडी क्र. 16336 नागरकोइल - गांधीधाम एक्स्प्रेस उडुपी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. 12283 एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस जोकट्टे येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. 22655 एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस थलास्सेरी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसतिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16.55 वाजता शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला.

गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) - तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस सावंतवाडी रोडला पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे पाठीमागे वळवण्यात येईल. गाडी क्र. 22113 लोकमान्य टिळक (टी) - कोचुवेली एक्स्प्रेस सिंधुदुर्ग येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शन मार्गे पाठीमागे वळवला जाईल. गाडी क्र. 12432 ह. निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस राजापूर रोड येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शनमार्गे मागे वळवली जाईल. गाडी क्र. 19260 भावनगर - कोचुवेली एक्स्प्रेस रत्नागिरी येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. 12223 लोकमान्य टिळक (टी) - एर्नाकुलम एक्स्प्रेस चिपळूण येथून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. 20932 इंदूर जं. - कोचुवेली एक्स्प्रेस सुरत - जळगाव मार्गे वळविण्यात आली आहे.

विलंबामुळे प्रवाशांना त्रास

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मान्सून कालावधीसाठी कमी करण्यात आलेला आहे. त्याशिवाय मध्य रेल्वे विभागात पाणी आल्याने गाड्यांना उशीर होत होता. त्यातच पेडणेतील रुळावरील पाण्यामुळे या मार्गावरील सेवाच कोलमडली आहे. याचा त्रास प्रवास करणार्या प्रवाशांना झाला. गाड्यांची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना एसटी बसेस किंवा खासगी पर्यायाचा वापर करावा लागत आहे.

SCROLL FOR NEXT