Goa News 
गोवा

Mapusa Flyover Construction | म्हापसा पेडे जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम सुरू; लवकरच वाहतूक कोंडी सुटणार

Mapusa Flyover Construction | कामास गती; उड्डाणपुलासाठी ३३.३१ कोटींचा होणार खर्च

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा पेडे,

म्हापसा जंक्शनवरील उड्डाण पुलाचे तथा भूयारी मार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम कंत्राटदार कंपनीने हाती घेतले आहे. या उड्डाणपुलासाठी ३३.३१ कोटी रुपये खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केला जाणार आहे.

जंक्शनवरील वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. पेडे, आकय, कामरखाजन, करासवाडा या म्हापसा शहरातील रहिवाशांसह पेडणे ते वाळपई आणि आंतरराज्य प्रवासी वर्गा बरोबरच पेडे क्रीडा संकुलाचा लाभ घेणारे खेळाडू यांच्यासाठी हे जंक्शन धोकादायक ठरले होते.

महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून हे जंक्शन धोकादायक तसेच अपघात प्रवण क्षेत्र बनले होते. या जंक्शनवर दरोज अनेक वाहन अपघात होते होते. त्यामुळे राज्य सरकारने या ठिकाणी भुयारी मार्ग (उड्डाण पूल) उभारण्याचा निर्णय घेतला होता. ची गरज निर्माण झाली आहे.

यासाठी स्थानिक आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, नगरसेवक विकास आरोलकर यांच्यासह स्थानिकांनी पाठपुरावा केला होता. स्थानिकांनी केली होती मागणी राष्ट्रीय महामार्ग ६६ रूंदीकरणापासून पेडे म्हापसा या जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती.

सुरुवातीला महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन केले होते; परंतु नंतर महामार्ग रूंदीकरण आराखड्यातून हे पूल वगळण्यात आले होते. यामुळे उड्डाणपुलाची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती.

५०४ दिवसांत काम पूर्ण करण्याची मुदत

गेल्या मे २०२५ मध्ये या पुलासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयातर्फे निविदा काढली होती. त्यानंतर बोलीदार कंत्राटदाराला ३३.३१ कोटी रूपयांचे हे काम सोपवण्यात आले. अंदाजे २०० मीटरचे हे उड्डाणपूल ५०४ दिवसांत पूर्ण करण्याची मुदत आहे.

पणजीकडे जाणारी वाहतूक एकेरी

या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी जंक्शनच्या दोन्ही बाजूंची महामार्गावरील वाहतूक म्हापसा पोलिसांनी सर्विस रोडवर वळवली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याने अपघात टाळण्यासाठी सर्व्हिस रोडवरील वाहतूक एकेरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT