Drug Case  Pudhari
गोवा

Mapusa Court Drugs Case | ड्रग्जप्रकरणातील संशयित स्टीफन हम्बर्ट निर्दोष मुक्त

Mapusa Court Drugs Case | तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बार्देश तालुक्यातील बोंदिरवाडा शापोरा येथे सुमारे १८ लाखांच्या ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या संशयित स्टिफन हम्बर्ट याला म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पोलिस तपासकामातील अनेक त्रुटीमुळे निर्दोष ठरवले.

हे ड्रग्ज संशयिताकडे सापडल्याचे पुराव्यानिशी सरकारी वकील अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे. हणजूण पोलिसांनी १७ जानेवारी २०१८ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास बोंदिरवाडा - शापोरा येथे एका युवकाला अटक केली होती व त्याच्याकडून १३.६ ग्रॅम एलएसडी, ५३.७ ग्रॅम कोकेन, ६ ग्रॅम चरस ड्रग्ज व रोख रक्कम जप्त केली होती. या एकूण ड्रग्जची किंमत सुमारे १८ लाख रुपये होते.

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून न्यायालयात आरोपपत्र संशयिताविरुद्ध दाखल केले होते. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमध्ये संशयिताच्या कपड्यांचे वर्णन नमूट करण्यात आले होते व त्याच्या आधारे है कारवाई झाली होती मात्र, संशयिताचे ते कपडे आरोपपत्रासोबत मालमत्तेसोबत जोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ह कारवाई संशयास्पद तसेच तपासकामात अनेक त्रुटी आढळल्याने पुराव्याअभाव संशयिताला निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निवाड्यात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT