पणजी :
पर्वरी येथील मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात नायक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने ते आणि त्यांचे सुरक्षा हल्ल्यातून बचावले.
रक्षक या मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात नायक यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकूण सहा गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्याचे प्राथमिक माहितीत नमूद केले आहे. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली.
नायक यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेल्याने मोठा अनर्थ टळला. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.