विधानसभेत आज म्हादईच्या प्रश्नासंदर्भात आमदार मायकल लोबो यांनी आवाज उठविला.  Pudhari News Network
गोवा

Goa Assembly Session | गोव्याच्या अस्तित्वासाठी म्हादई नदी वाचवणे आवश्यक : मायकल लोबो

म्हादई नदीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा : म्हादईचे पाणी कर्नाटक वळवत आहे. गोव्याचे अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल तर म्हादई नदी वाचवणे आवश्यक आहे, असे मत आमदार मायकल लोबो यांनी आज (दि.३१) विधानसभेत व्यक्त केले. (Goa Assembly Session)

म्हादई नदी गोव्याची जीवनदायिनी

विधानसभेत आज म्हादईच्या प्रश्नासंदर्भात आमदार लोबो बोलत होते. ते म्हणाले की, म्हादई नदी गोव्याची जीवनदायिनी आहे. जलस्रोत मंत्र्यांनी या प्रश्नी गंभीर भूमिका घ्यावी. म्हादईवरील बंधारे बांधण्यासाठीही सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी. (Goa Assembly Session)

पाण्याचे नियोजन योग्यरितीने व्हावे

राज्यातील पाण्याचे नियोजन योग्य रितीने व्हावे. चार महिन्यांपूर्वीही आपण म्हादई प्रश्नी सरकारने आग्रही भूमिका घेण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी पडतेच, या कालावधीत नदीचा प्रवाहही मोठा असतो. मात्र, राज्याला नदीच्या प्रवाहाचे पाणी मिळावे. कमतरता भासू नये. या संदर्भात नियोजन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT