girl assault  file photo
गोवा

Madgaon School Principal Case | उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांचे काळं कृत्य; विद्यार्थ्यांनी मागितले सीसीटीव्ही फुटेज

Madgaon School Principal Case | पीडित विद्यार्थ्यांची मागणी; शिक्षण खात्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

उच्च माध्यमिक विद्यालयात घडलेल्या गंभीर आणि धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण कुशावती हादरला आहे. संबंधित प्राचार्यांच्या कृत्यांबाबत सत्य समोर आणण्यासाठी शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा तसेच त्यांनी वर्ग घेतलेल्या सर्व कक्षांतील सीसीटीव्ही फुटेज तत्काळ तपासण्याची मागणी त्या पीडित विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच असे गैरवर्तन होणे निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पीडित विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याकडे ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही पीडित विद्यार्थ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर पुढारीशी बोलताना सांगितले की, आम्ही प्राचार्यांच्या गैरकृत्याबाबत बोलण्याचा प्रयत्न केल्यावर आमच्या आई-वडिलांना धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आम्हाला बारावीच्या परीक्षेला मुकावे लागणार असल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता आम्हाला उघडपणे तक्रार करणेही कठीण झाले आहे. आमच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालणे किंवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणे हे घातक आहे. त्या प्राचार्याची सर्व गैरकृत्ये समोर आणण्यासाठी शिक्षण खात्याने कोणताही विलंब न करता सीसीटीव्ही फुटेज तपासून घ्यावे.

सदर उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळा, प्राचार्य शिकवताना वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच त्यांच्या केबिनमधील कॅमेरे तपासावेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यास या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे पुरावे नक्कीच हाती लागतील, असे त्या पीडित विद्यार्थ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT