पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे अग्निकांडप्रकरणातील नाईट क्लबचे मालक गौरव व सौरभलुधरा बंधूंना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला. मात्र, त्यांना म्हापसा पोलिसांनी बोगस प्रमाणपत्रप्रकरणी अटक केली आहे. त्यांचा या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी प्रलंबित आहे.
त्यामुळे हणजूण गुन्ह्यामध्ये जामीन मिळाला असला तरी लुथरा बंधूंना अजूनही कोठडीत राहावे लागणार आहे. या अग्निकांडप्रकरणातील लुधरा बंधू यांचा नाईट क्लब व्यवसायामधील भागिदार अजय गुप्ता याला यापूर्वीच सशर्त जामीन मिळाला होता. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी न्यायालयात तपासकाम पूर्ण करून बंधू आरोपपत्र सादर केले आहे.
त्यामुळे लुथरा बंधूंना कठोर अटी घालून जामीन देण्यास हरकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन देताना नोंदवले. संशयितांना प्रत्येकी ५० हजारांचा जाचमुचलका व तत्सम रकमेचा एर हमीदार सादर करणे व इतर नियमित अटी लागू असतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.