मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच पालकाला बेदम मारहाण file photo
गोवा

Goa Political Controversy | 'त्या' रंगेल नगरसेवकाला पत्नी, मैत्रिणीकडून बेदम चोप

Goa Political Controversy | बायको घरी, साहेबांची मनं बाहेरी असा त्याचा लहरी स्वभाव. घरात धर्मपत्नी आणि बाहेर मैत्रीण असताना पुन्हा प्रेमात पडण्याचा प्रसंग त्याच्या चांगलाच अंगलट आला.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

किशोरवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या नगरसेवक पुत्राच्या कारनाम्यांनी कुडचडे मतदारसंघ चर्चेत असताना आता कुशावती जिल्ह्यातील एका विलासी नगरसेवकाच्या कृष्णकृत्यामुळे जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. बायको घरी, साहेबांची मनं बाहेरी असा त्याचा लहरी स्वभाव. घरात धर्मपत्नी आणि बाहेर मैत्रीण असताना पुन्हा प्रेमात पडण्याचा प्रसंग त्याच्या चांगलाच अंगलट आला.

दररोज रात्री तिसरीला घेऊन जंगलाची वाट धरणाऱ्या या रंगेल बाबाला मैत्रिणीने पाठलाग करून रंगेहात पकडले. एवढ्यावर न थांबता त्याच्या धर्मपत्नीला बोलावून घेत दोघींनीही त्याला यथेच्छ चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. धर्मपत्नीने या विलासी पतीदेवाला घरातून हाकलून दिले आहे.

या घटनेचे व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून जिल्ह्याची इज्जत या नगरसेवकाने धुळीला मिळवल्याची चर्चा सुरू आहे. सविस्तर माहितीनुसार त्याला पत्नी आणि मुले आहेत. तरीही त्याची बाहेर अनेक लफडी सुरू होती. त्याच्या या रंगेल स्वभावाची अनेकांना कल्पना आहे.

आपल्या प्रियकराच्या प्रेमाला आणखी अंकुर फुटल्याचे मैत्रिणीच्या नजरेत आले. बऱ्याच वेळा तिने त्याबाबत त्याला विचारणा केली होती; मात्र 'तसे' काहीच नाही, असे सांगून तो वेळ मारून नेत होता. मात्र, रोज अंधार पडल्यावर याची गाडी कुठे जाते म्हणून सोमवारी तिने त्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. तिला दोन गाड्या दिसल्या.

एके ठिकाणी दुसरी गाडी थांबली व त्यातून एक महिला उतरली व ती त्या नगरसेवकाच्या गाडीत जाऊन बसली. पाठलाग करणाऱ्या महिलेने त्यांचा व्हिडीओ बनवणे सुरू केले. संतापलेल्या मैत्रिणीने थेट नगरसेवकाच्या धर्मपत्नीलाच फोन केला आणि तिलाही घटनास्थळी बोलावून घेतले.

आपल्या पतीच्या तिसऱ्या महिलेबरोबरच्या लीला पाहून धर्मपत्नीमधील रणरागिणी जागी झाली. दोघींनीही मिळून त्या रंगेल नगरसेवकाला बरेच चोपून काढले. शिवाय त्यांच्या कारगाड्याही फोडल्या. हा प्रकार कळून येताच गावकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले. या संपूर्ण घटनेचे बऱ्याच जणांनी मोबाईलवर चित्रीकरण केले आहे.

मारामारी बरोबर गाड्या फोडण्याच्या प्रकारामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. रात्री उशिरा या घटनेबाबत दोन परस्परविरोधी तक्रारी नोंद झाल्या. मारहाण झालेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. नगरसेवकाच्या पत्नीने दै 'पुढारी'शी बोलताना पोलिसांनी आपणाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT