राज्यातील पेट्रोल पंपांवर ‌‘मल्टी एनर्जी स्टेशन्स‌’चा विस्तार वेगाने होणार  pudhari photo
गोवा

Kudal Fuel Shortage | सिंधुदुर्गात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक

Kudal Fuel Shortage | कुडाळात एका पंपावर वादावादी; प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी अचानक पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. शहरातील प्रमुख चारही पेट्रोल पंपांवरील साठा संपल्याने 'पेट्रोल-डिझेल संपले आहे' अशा सूचनांच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. यामुळे दिवसभर वाहनधारकांना इंधनासाठी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर पायपीट करावी लागली.

शुकशुकाट, प्रवाशांचे हाल सोमवारी सकाळपासूनच शहरात इंधन टंचाई जाणवू लागली. साठा संपल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारांपासून ते लांबचा प्रवास करणाऱ्या पर्यटकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसला. अनेक नागरिकांना आपले नियोजित दौरे रद्द करावे लागले.

पेट्रोलचे टँकर वेळेवर न पोहोचल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येत असून, मंगळवारी सकाळपर्यंत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. कुडाळ शहरात इंधन मिळत नसल्याने वाहनधारकांनी माणगाव आणि पिंगुळी (काळेपाणी) येथील पंपांकडे धाव घेतली. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या

कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; तक्रार दाखल

कुडाळ शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून कारचालक आणि पंप कर्मचारी यांच्यात तीव्र वादावादी झाली. डिझेल भरताना अचानक मशिन बंद पडल्याच्या कारणावरून कारचालकाने कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली.

हे प्रकरण अखेर कुडाळ पोलिस ठाण्यात पोहोचले असून, कर्मचाऱ्यांनी संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. शहरात वारंवार अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पुरेसा इंधन साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता वाहनधारकांमधून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT