Arrest Pudhari
गोवा

केरळमध्ये फसवणूक; गोव्यात मौज कळंगुट येथील हायप्रोफाईल पार्टीतून संशयित गजाआड

केरळमध्ये फसवणूक; गोव्यात मौज कळंगुट येथील हायप्रोफाईल पार्टीतून संशयित गजाआड

पुढारी वृत्तसेवा

goa Calangute party fraud suspect held

पणजी : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन सुवर्णकाराची फसवणूक करून गोव्यात पर्यटक म्हणून मौजमजा करण्यासाठी आलेल्या केरळच्या सराईत भामट्याला गोवा पोलिसांनी कळंगुट येथील एका हायप्रोफाईल पार्टीमधून एखाद्या फिल्मी स्टाईलने अटक केली. त्याच्याकडून खरेदी केलेले लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याला ताब्यात घेण्यासाठी केरळ पोलिस पथक गोव्यात दाखल झाले आहेत.

केरळमधील कासरकोड येथे गुन्हेगाराने बनावट ऑनलाईन पेमेंट दाखवून सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. त्यासंदर्भातची तक्रार सराफ दुकानदाराने बाकेल पोलिस स्थानकात नोंद केली होती. गुन्हेगार गोव्यात गेल्याची माहिती कासरकोड पोलिसांनी मिळवताच ती गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँच अधीक्षकांना दिली.

अधीक्षकांनी निरीक्षक दत्तगुरू पथक स्थापन केली. गुन्हेगार रात्रीच्यावेळी पार्टीमध्ये सहभागी होण्याचा शक्यता वर्तवून किनारपट्टी भागातील पार्थ्यांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. त्याचा शोध सुरू असताना ३० मे रोजी तो कळंगुट येथील एका हायप्रोफाईल पार्टीमध्ये असल्याची माहिती पोलिस खबऱ्यांनी दिली.

हा संशयित अट्टल सराईत गुन्हेगार असून चोरी केल्यानंतर तो पथक स्थापन केली. गुन्हेगार रात्रीच्यावेळी पार्टीमध्ये सहभागी होण्याचा शक्यता वर्तवून किनारपट्टी भागातील पार्थ्यांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. त्याचा शोध सुरू असताना ३० मे रोजी तो कळंगुट येथील एका हायप्रोफाईल पार्टीमध्ये असल्याची माहिती पोलिस खबऱ्यांनी दिली.

हा संशयित अट्टल सराईत गुन्हेगार असून चोरी केल्यानंतर तो जायचा. अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती. कॅसिनो व मोठ्या संगीत ओल्या पार्ध्यामध्ये चोरलेले पैसे उडवायचा. त्यामुळे केरळ पोलिसांनी ही माहिती गोवा पोलिसांना दिली होती.

क्राईम बँचच्या पथकाचे अधीक्षकांकडून अभिनंदन

क्राईम ब्रँचच्या पथकाने त्यांचा अनुभव पणास लावून गुन्हेगाराला गजाआड केल्याने निरीक्षक दत्तगुरू सावंत व त्याच्या पथकाचे अधीक्षकांनी अभिनंदन केले.

वेशांतर करून पोलिस पार्टीत...

निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी आपल्या पथकासह या पार्टीमध्ये वेशांतर करून गेले होते. त्यांनी पार्टीमध्ये गुन्हेगार कोठे आहे, त्याचा शोध घेतला. त्याचा शोध लागल्यावर पोलिस पथक त्याच्यापर्यंत पोहोचले. केरळमधून दागिने खरेदी करून गोव्यात आलेला हाच गुन्हेगार असल्याची खात्री पटल्यावर त्याला पोलिसांनी बाजूला घेतले व त्याच्याशी एखाद्या सामान्य लोकांप्रमाणे चर्चा केली. त्याला संशय आल्याने तो पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेऊन रायबंदर क्राईम ब्रँचमध्ये आणले. त्याला पोलिसांचा हिसका दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच बनावट पेमेंटने खरेदी केलेला नेकलेस व सोन्याच्या अंगठ्या पोलिसांनी हस्तगत केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT