पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. आज (दि.२९) दुपारपर्यंत गोव्याची पदक संख्या २१ वर पोहोचली आहे. यामध्ये २ सुवर्णपदके, ४ रौप्यपदक आणि १५ कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत यापूर्वी गोव्याने सर्वात जास्त १६ पदके जिंकली होती. गोव्यात आयोजित राष्ट्रीय क्रीडास्पर्धा गोव्याला लाभदायी ठरत आहे. आज पेनकेक सीलीट क्रीडा प्रकारारात करीना शिरोडकर हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तर गोव्यचे खेळाडू सागर पालकोंडा , सिराज खान व मोहम्मद इरफान खान या तिघांनी मिळून सांघिक पेनकेक सीलाट स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. या कामगिरीमुळे गोव्याची एकूण पदक संख्या २१ झाली आहे.
हेही वाचा :