Indian Coast Guard  
गोवा

Indian Coast Guard | तटरक्षक दलाकडून व्यापारी जहाजावरील दोन जखमी खलाशांची सुखरूप सुटका

Indian Coast Guard | मानवतावादी मदत आणि तत्पर बचावकार्याचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण या मोहिमेतून पाहायला मिळाले.

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय तटरक्षक दलाने गोव्याच्या किनाऱ्याजवळ पनामा ध्वजावरील एमटी हॉक्स लिबर्टी या व्यापारी जहाजावरील दोन गंभीर जखमी खलाशांची यशस्वी वैद्यकीय सुटका करून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. मानवतावादी मदत आणि तत्पर बचावकार्याचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण या मोहिमेतून पाहायला मिळाले.

मालदीवहून प्रवास करत असताना जहाजावरील जिमशेर डेविटाझे (३७, जॉर्जिया) आणि अरुण बाबू वरुकाटू (३४, भारत) यांची प्रकृती गंभीर झाली. दोघेही हालचाल करण्यास असमर्थ असल्याने तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता निर्माण झाली होती. माहिती मिळताच गोवा तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाने जहाज प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून बचाव मोहीम सुरू केली.

आयसीजीएस अक्षय या तटरक्षक जहाजावरील पथकाने कौशल्याने दोन्ही खलाशांना व्यापारी जहाजावरून सुरक्षितपणे बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. यानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने राज्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तटरक्षक दलाच्या त्वरित कारवाईमुळे दोघांनाही वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले. समुद्री सुरक्षेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत मानवतावादी मदत आणि आंतरराष्ट्रीय सागरी बचावकार्यातील आपली बांधिलकी भारतीय तटरक्षक दलाने या मोहिमेद्वारे पुन्हा अधोरेखित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT