In Goa, the cases of women abuse increased
गोव्यात महिला अत्याचाराची प्रकरणे वाढली Pudhari Photo
गोवा

Goa Assembly Session : 'गोव्यात महिला अत्याचाराची प्रकरणे वाढली'

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ झाली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिलेल्या लेखी माहितीनुसार राज्यात दररोज किमान एका महिलेवर अत्याचार होतो. गेल्या पाच वर्षांत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रतिदिन नोंदवलेले प्रमाण 0.83:1 आहे, असे मुख्यमंत्र्यांनी कुडतरीचे आमदार आमदार रेजीनाल्ड यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

गेल्या पाच वर्षात महिलांवरील विनयभंग, लैंगिक अत्याचार, अपहरण अशी एकूण 1530 प्रकरणे नोंदवली गेली. त्यांनंतर तेवढेच गुन्हे नोंद झाले.

यावेळी डॉ. सावंत यांनी गोवा पोलिसांनी महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची यादी सादर केली आहे. यात टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1091 आणि 112 चोवीस तास सेवा देत असतात. तसेच महिलांसाठी टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक 247 उपलब्ध आहे. 7875756177 या क्रमांकावर देखील पोलिस नियंत्रण कक्षात 24 तास सेवा कार्यरत आहे.

महिला आणि बाल संरक्षण युनिटच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले आहेत. महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्याने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जनतेमध्ये पोलिसांप्रती विश्वास वाढवणे व पोलिसांशी संपर्कात राहणे या उपक्रमाचा समावेश असून महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी गुलाबी पोलीस वाहने उपलब्ध केली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यानी गुलाबी वाहनांची याची सादर केली.

पोलिसांनी महिला संरक्षणाबाबत जागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी कार्यशाळांचे आयोजन करुन स्वरक्षणाचे धडे दिले आहेत. लैंगिक गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी गोवा पोलिसात पीडित संपर्क विभाग (व्हीएलओ) ची नियुक्ती करण्यात आली आहे. वीएलओची मुख्य भूमिका म्हणजे तपास आणि फौजदारी न्याय कारवाईचे दुर्लक्षित परिणाम कमी करण्यासाठी पीडितेचे कुटुंब आणि पोलीस यांच्यासाठी संपर्क राखणे आहे. असे उत्तर मुख्यमंत्र्यानी दिले.

SCROLL FOR NEXT