Goa Cyber Crime | दक्षिण गोव्यात सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ; 6 वर्षात 85.32 लाख रुपये लंपास

दक्षिण गोव्यातील प्रकरणांतून माहिती समोर
Cyber Crime News
गोवा राज्यात सायबर क्राईमद्वारे सहा वर्षात 85.32 लाख रुपये लंपास. File Photo
रविना कुरतरकर

मडगाव : राज्यात ऑनलाईन फसवणुकीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ आढळून आली. दक्षिणेत गेल्या सहा वर्षांत 85,32,080 रुपये सायबर क्राईमच्या माध्यमातून लंपास करण्यात आले आहेत. महादेव सट्टा अ‍ॅपच्या रॅकेटने 100 कोटीहून अधिक व्यवहार केल्याचे प्रकार घडले आहेत.

आर्थिक फसवणुकीचा पहिला प्रकार ऑनलाईन पद्धत आहे. यात गुन्हेगार इंटरनेटच्या तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक करतात. तर दुसरा ऑफलाईन प्रकार असून यात पतसंस्था किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंगचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. दक्षिण गोव्यात घडलेल्या बहुतांश सायबर क्राईममध्ये गुन्हेगार नागरिकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून त्याचे डेबिट व क्रेडीट कार्ड ब्लॉक किंवा कालबाह्य झाल्याचे सांगतात. त्यानंतर कार्ड नूतनीकरणासाठी पीडिताकडून बँक कार्डची आवश्यक माहिती मिळवतात. कार्ड तपासणी वेल्यू (सीव्हीव्ही) क्रमांक, वन टाईम पासवर्ड (ओटीपी), तसेच पासवर्ड मागतात नंतर हे घोटाळेबाज पीडित नागरिकांच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढून त्याची फसवणूक करतात.

२०१९ मध्ये दक्षिण गोव्याच्या कोलवा पोलिस स्थानकात 1,25,000 रुपयांचा गंडा घातल्याचा सायबर गुन्हा नोंद झाला होता. 2020 मध्ये मडगाव पोलिस स्थानकात 4, केपे स्थानकात 1, काणकोण स्थानकात 2, वेरणा पोलिस स्थानकात 1 फोंडा येथे 4 सायबर क्राइम अंतर्गत गुन्हे नोंद झाले. 10,39,734 रुपयांचा गंडा विविध प्रकरणात घातल्याची नोंद झाली. 2021 मध्ये मडगाव, कुंकळ्ळी, फातोर्डा, दाबोळी, पोलिस स्थानकात प्रत्येकी एक आणि फोंडा येथे चार सायबर क्राईम गुन्ह्यांची नोंद झाली. 10,77,720 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला.

Cyber Crime News
सायबर क्राईम घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी : Cyber Crime

2022 मध्ये मडगाव पोलिस स्थानकात 2, कोलवा येथे 2, कुंकळ्ळी येथे 1, फातोर्डा येथे 4, वास्को येथे 5, वेर्णा येथे 3, मुरगाव येथे 3, फोंडा येथे 4 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. 27,41,722 रुपयांचे ऑनलाईन ट्रेनसेक्शनद्वारे लुबाडले आहे. 2023 मध्ये मडगाव, फातोर्डा, सांगे, कुडचडे, केपे, मुरगाव आणि कुळे पोलिस स्थानकात प्रत्येकी एक सायबर गुन्हा नोंद झाला. कुंकळ्ळी, काणकोण आणि फोंडा या पोलीस स्थानकात प्रत्येकी दोन सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. 2023 मध्ये 29,10,635 रुपयांचा गंडा घालण्यात आला. 2024 वर्षांत कोलवा, कुंकळ्ळी, काणकोण, वास्को, फोंडा, या पोलीस स्थानकात प्रत्येकी एक सायबर गुन्हा नोंद झाला. एकूण 6,37,269 रुपयांवर डल्ला मारला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news