पणजी: दिग्दर्शक श्रीहरी हरिदास आणि अभिनेत्री देवारंजिनी. आणि आर्या मनी किशन.  
गोवा

Debut Film From Job Savings IFFI- कॉर्पोरेट नोकरीतील बचतीतून साकारला पहिला चित्रपट

श्रीहरी हरिदास : संवेदनशील मुद्दे मांडणारा अजेंयेंद्र मरणम्चा उलगडला प्रवास

पुढारी वृत्तसेवा

पणजी : क्रांतिराज सम्राट

अजयेंद्र मरणम् हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित असून त्यामध्ये आत्महत्या, टॉक्सिक परेंटिंग आणि मानसिक आरोग्य यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य केले आहे. अनेक जणांना शालेय किंवा कॉलेजचे दिवस पुन्हा जगायचे असतात, मात्र काहींना तसे वाटत नाही. अशाच अनुभवांभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. काही मित्रांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक खऱ्या घटनांवर हा विषय आधारित आहे, असे दिग्दर्शक श्रीहरी हरिदास यांनी सांगितले.

कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सांभाळत आणि आपल्या बचतीतून एका नवोदित मल्याळम दिग्दर्शक श्रीहरी हरिदास यांनी अजेंयेंद्र मरणम् हा मल्याळम चित्रपट तयार केला आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आणि पहिलाच महोत्सव अनुभव आहे.

दिग्दर्शक म्हणून २०१७ पासून लघुपट दिग्दर्शित करत असून, नोकरीच्या वेळेनंतर कथा आणि पटकथा लेखनाचे काम करण्यात आले. या चित्रपटासाठी कागदावर पटकथा तयार होण्यास सुमारे एक महिना, तर प्री-प्रॉडक्शनसाठी जवळपास सहा महिने लागले. चित्रीकरणासाठी आठवड्यातील सात दिवस आणि पॅचवर्कसाठी तीन दिवस अशी सुमारे दहा दिवसांची शूटिंग झाली. प्री-प्रॉडक्शन, चित्रीकरण आणि पोस्ट-प्रॉडक्शन मिळून संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला.

प्रेरणा, आव्हाने

श्रीहरी यांनी सांगितले की, प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक के. जी. जॉर्ज यांचा मोठा चाहता असून 'पंचवडी पालम' आणि 'आदामिंटे वारियल्लु' यांसारख्या त्यांच्या कलाकृर्तीचा प्रभाव आहे. तसेच एका चित्रपटाच्या नावावरून त्यांना आपल्या चित्रपटाचे नाव ठेवण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीपासूनच अनेक चढ-उतार आणि आव्हाने समोर आली असली, तरी भक्कम टीमच्या साथीने चित्रपटाचा प्रवास सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रामुख्याने महोत्सवांसाठी बनवलेला चित्रपट असून, पुढे योग्य वेळी ओटीटी माध्यमासाठीही प्रयत्न केले जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT