Harmal Goa News  pudhari photo
गोवा

Harmal Goa News | किनारी भागातील भिकारी पर्यटकांसाठी डोकेदुखी

Harmal Goa News | हरमल भागात परप्रांतीय मद्यपींचा पर्यटकांना मनस्ताप; नागरिकांत संताप

पुढारी वृत्तसेवा

हरमल : पुढारी वृत्तसेवा

येथील प्रमुख व अन्य अंतर्गत रस्ता मार्गात परप्रांतीय कामगार तसेच काही विदेशी पर्यटक मंडळीच्या वाढत्या दारू व्यसनामुळे तसेच भिकारी लोकांमुळे स्थानिक नागरिकांत चीड असून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गेले कित्येक दिवस या भागातील फुटबॉल मैदाननजीक असलेल्या मोकळ्या जागेत त्यांचा राबता असतो. १२ रोजी एका परप्रांतीय कामगार बेशुद्ध अवस्थेत दगडाच्या घरंगळीत निपचित पडला होता. त्याला शुद्धी नसल्याने वी एल ओ महेश गावडे यांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून बोलावून घेतले व त्याची रवानगी केली.

मात्र, त्यांच्याकडील रोख व मोबाईलमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्याची मागणी नागरिक गुरू नाईक यांनी केली आहे. भिकाऱ्यांची संख्या चिंतनीय या भागातील बीच रोडवरील पदपथावर भिकारी बाया व मुलांचा वावर असल्याने, पर्यटकांना लक्ष्य करून सतावण्याचे प्रकार चालू असल्याने नाराजी आहे.

कित्येक वेळा स्थानिक नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रकार केला मात्र काहीही बदल नाही. या गटातील काही वयस्कर ज्येष्ठ नागरिक पायाला जखम असल्याच्या बँडेज लावून भीक मागत असल्याचे चित्र असते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे ढोंग असून, रात्री चक्क दारूच्या बाटल्या रिजवून लोळत पडल्याचे चित्र असते, असे नागरिक रंगनाथ हरमलकर यांनी सांगितले.

चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

या लोकांचा वावर दरवर्षी पर्यटन हंगामात होत असल्याचे दिसून येते. मात्र त्यांच्या वास्तव्य व वावरावर कोणतेच लक्ष नसल्याने भुरट्या चोप्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी तक्रारी होत नसल्याने त्यांचे फावते त्यातच विदेशी पर्यटक त्या गरीब मंडळींना पाठीशी घालीत असल्याने काहीनी संताप व्यक्त केला. पोलिस व सबंधित खात्याने याबाबतीत लक्ष घालून त्यांना आवरण्याची तसेच त्यांची रवानगी सुधारगृहात करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT