पणजी : प्रभाकर धुरी
गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर माशांची चमचम वाढली आहे. २०२१-२२ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये मासे मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील मत्सोत्पादनात गेल्या ५ वर्षांत २५.१ टक्क्यांची वाढ झाली असून, उत्पादन १ लाख १६ हजार २५३ टनांवरून १ लाख ४५ हजार ४९२ टनांवर पोचले आहे. यात समुद्रातील, गोड्या पाण्यातील आणि फार्ममधील माशांचा समावेश आहे, अशी माहिती मत्स्य खात्याच्या संचालक डॉ. शमिला मोोंतेरो यांनी दिली.
२०२२ ते २०२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये बांगड्यांचे उत्पादन घटले आहे. मात्र, २०२१-२२ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये उत्पादन अनुक्र메 २६,१८८, ५५,८४३, ५३,७२८ व ४४,२५२ असे आहे. प्रॉन्सच्या उत्पादनात तिप्पट वाढ प्रॉन्सच्या उत्पादनात या पाच वर्षांत तिप्पट वाढ झाली. २०२१-२२ मध्ये ४,८०७ टन उत्पादन उत्पादन मिळाले होते, तर २०२५-२६ मध्ये ते १३,००६ टनांवर पोचले आहे. पाच वर्षातील उत्पादन अनुक्रमे १,८३,४४९,९४,४९६,६४६४ टन असे नोंदवले गेले.