Goa Politics File Photo
गोवा

Goa Politics | नवे चेहरे देण्याचा भाजपला फटका; तरीही बहुमत राखण्यात यश

Goa Politics | भाजपकडून निवडणूक रिंगणात उभे होते तब्बल ९० टक्के उमेदवार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० जागांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालानुसार ५० जागापेकी भारतीय जनता पक्षाला २९, काँग्रेसला १०, मगो पक्षाला ३, रिव्हूलशनरी गोवन्स (आरजी) २, गोवा फॉरवर्ड १, आम आदमी पक्ष (आप) १ व ४ अपक्ष अशा जागा मिळाल्या.

या निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास ४० पैकी ३६ नवे उमेदवार दिल्यामुळे भाजपचे संख्याबळ घटले व ते ३३ वरुन २९ वर आले, ३६ जागा लढवलेली काँग्रेस फक्त सासष्टी तालुक्यापुरता मर्यादीत असल्याचे पुन्हा सिध्द झाले या पक्षाला ५० पैकी १० जागा मिळाल्या.

आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने जागा पटकावल्या व ४२ जागा लढवलेल्या आपला फक्त राज्यभरात एकमेव जागा कोलवा तीही अवघ्या ७३ मतांच्या फरकाने मिळाली. गोवा फॉरवर्डने काँग्रेस सोबत युती करून ९ जागा मागवून घेतल्या मात्र त्यांनाही एकमेव जागा वगळता इतरत्र या पक्षाची डाळ शिजली नाही.

सर्व पक्षात मगो पक्ष मात्र १०० टक्केयशस्वी पक्ष ठरला या पक्षाने लढवलेल्या तीन जागा या पक्षाने जिंकल्याच त्याच सोबत त्यांचे कार्यकर्ते सुनील भोमकर हे बेतकी खांडोळात अपक्ष जिंकले. दोन्ही जिल्हा पंचायतीच्या प्रत्येकी २५ जागा आहेत.

त्यामुळे बहुमतासाठी १३ जागा हव्या, भाजपने उत्तर गोव्यात १८ जागा जिंकल्या व मगोची एक सदस्य मिळून २० जनांचे पाठबळ असल्याने व दक्षिण गोव्यात भाजपने स्वता ११ जागा, मगो पक्षाने २ जागा जिंकल्याने तेथेही बहुमत मिळाले आहे. दक्षिणेत कुठ्ठाळीच्या अपक्ष सदस्यांसोबत खांडोळात निवडून आलेले अपक्ष यांचा पाठिंबा भाजपला मिळणार असल्याने दोन्ही जिल्हा पांयतीवर भाजपची पुन्हा सत्ता स्थापन होणार आहे.

गोवा फॉरवर्डला एकच जागा

राज्यातील नऊ जागा लढवलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. राय या मतदारसंघात त्यांची उमेदवार १,३४१ मतांनी जिंकली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून ज्या तीन जागा मागून घेतल्या होत्या, त्यातील फातोर्डा ही पालिकेत येत तर मांद्रे व मये या मतदारसंघात प्रत्येकीदोन जिल्हा पंचायत मतदारसंघ येतात. हे चारही मतदारसंघात गोवा फॉरवर्डला पराभव स्विकारावा लागला. विजय सरदेसाई याचा करिष्मा काहीच दिसला नाही.

फक्त आमदारांनी अबू राखली

आजची पक्षानेही तब्बल ३० ठिकाणी उमेदवार उभे केले होते मात्र त्यांचा आमदार असलेल्या सांत अद्रेि मतदारसंघात येणाऱ्या दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ सांताक्रुझ व सेंट लॉरेन्स वगळता इतरत्र या पक्षाचा करिष्मा चालला नाही. उजो उजो म्हणून जोरदार घोषणा देत युवकांना एकत्रित करून या पक्षाने निवडणुक लढवली मात्र अद्यापही राजकारणामध्ये हा पक्ष नवाच आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले. आमदार वीरेश बोरकर यांनी आपला मतदारसंघ राखला, असेच म्हणावे लागेल.

काँग्रेसचे निसटते विजय

जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३६ जागा लढवल्या मात्र सासष्टीतील ७ जागा व हळदोण्यातील दोन व खोला ही जागा अशा १० जागा काँग्रेसने पटकावल्या. मात्र या हळदोण्याची जागी २७४ मतांनी आणि शिरसईची जागा अवघ्या ७९ मतांनी काँग्रेसने जिंकली आहे. तर खोलची जागा ५२ मतांनी जिंकली. उत्तर गोव्यात हळदोण्यात येणाऱ्या ज्या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या त्या माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या सहकार्यामुळे मिळाल्या आहेत. त्यामुळे या पक्षाला या निवडणुकीत तसे अपयशच आले असे म्हणावे लागेल.

मगोचे १०० टक्के यश

भाजपचा सहकारी असलेल्या मगो पक्षाने मोरजी, वेलिंग प्रियोळ व कवळे या तिन जागा लढवल्या होत्या त्या तिनही जिंकल्या. वर बेतकी खांडोळा मतदारसंघातून मगोचे कार्यकर्ते असलेले सुनील जल्मी भोमकर हे अपक्ष निवडून आले. त्यामुळे प्रियोळवरील मगोचा दावा भक्कम बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT