alcohol and gut health  FIle Photo
गोवा

Goa VAT Act 2005 | व्हॅट कायद्यात मोठी सुधारणा! फक्त इतके रुपये भरा अन् आयुष्यभरासाठी सुटका!

Goa VAT Act 2005 Amendment | गोवा सरकारच्या कायदा विभागाने गोवा मूल्यवर्धित कर कायदा, २००५ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजीः पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारच्या कायदा विभागाने गोवा मूल्यवर्धित कर कायदा, २००५ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे दारू विक्रेते, लहान बार आणि टॅव्हर्न यांना दरवर्षी कर रचनेच्या योजनेचे नूतनीकरण करण्याऐवजी फक्त एकदाच कर रचनेचा पर्याय निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हा बदल १ एप्रिलपासून लागू होत आहे. राज्य कर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, हा पर्याय फक्त एकदाच वापरता येईल आणि त्यासाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागेल, जोपर्यंत बार किंवा दारू दुकानदार स्वेच्छेने कंपोझिशन स्लॅबमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत तो आयुष्यभर वैध असतो. त्यामुळे व्हॅट अंतर्गत येणाऱ्या दारू विक्रेत्यांसाठी आणि बारसाठी हा एक मोठा दिलासा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT