धावे : पाण्याचे नमुने गोळा करताना पेयजल खात्याचे अधिकारी. pudhari photo
गोवा

Goa Valpoi | वाळपईत नळाच्या पाण्यामध्ये आढळले किडे

वाळपईत नळाच्या पाण्यामध्ये आढळले किडे

पुढारी वृत्तसेवा

धावे : वाळपई-म्हाऊस येथील सिद्धेश चारी यांच्या घरातील नळाच्या पाण्यामध्ये मंगळवारी किडे सापडली होती. बुधवारी सकाळीही त्यांना पाण्यामध्ये किडे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पेयजल खात्याच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले असून ते पणजी येथे प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत.

तसेच आजूबाजूच्या घरातील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून त्यांची तपासणी होणार आहे. प्राथमिक तपासणीमध्ये पाण्यामध्ये पुरेशी क्लोरीनची मात्रा असल्यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य असे होते. परंतु, खबरदारी म्हणून त्या वाड्यावर गेलेली संपूर्ण पाईप लाईन दोन-तीन वेळा धुऊन काढण्यात आली. जोपर्यंत पाणी तपासणीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत वाड्यावरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT