मडगाव : मृतदेह बाहेर काढताना पोलिस. pudhari photo
गोवा

Goa two youths drown| साळावली कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू

सलग घडणाऱ्या दुर्दैवी घटनांनी केपे हादरले

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा केपे तालुका सलग घडणाऱ्या दुर्दैवी घटनांनी पुरता हादरून गेला आहे. रविवारी साळावली कालव्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केपे तालुक्यात यापूर्वी भाऊ-बहिणीचा बुडून मृत्यू, राहत्या घरात माय-लेकीचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना, एका लहान मुलाच्या बुडून मृत्यूच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच पुन्हा दोन युवकांचा साळावली कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे.

रविवारी सकाळच्या सुमारास साळावली कालव्याजवळील डॉन बॉस्को शाळेनजीक ही घटना घडली. हर्षित (वय २३, रा. उत्तराखंड) आणि इप्रेशियस फर्नाडिस (२५, रा. उत्तराखंड) अशी मृतांची नावे असून, दोघेही बोमरीमोडी परिसरात साळावली कालव्यात आंघोळीसाठी आले होते. कालव्याच्या पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक रहिवाशाला कालव्याजवळ एक दुचाकी बराच वेळ संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आली. यामुळे त्याने परिसरात शोध घेतला असता, कालव्याच्या पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. त्याने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच केपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. केपेचे उपनिरीक्षक दिर्गवर चोंद्रे यांनी पटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

केपे तालुक्यात भीतीचे वातावरण

सलग घडणाऱ्या दुर्घटनांच्या घटनांमुळे केपे तालुक्यात भीतीचे बातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT